
ऑनलाईन साईटवरून आपण एखादी महागडी गोष्ट मागवतो आणि भलतीच वस्तू समोर आल्याच्या अनेक घटना वाचल्या असतील. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. एका व्यक्तीने अॅमेझॉनवरून 30 हजारांचे घड्याळ खरेदी केले. पण जेव्हा त्याने घड्याळाचा बॉक्स उघडला त्यावेळी त्याला धक्का बसला.
घड्याळाची डिलिव्हरी व्यक्तीच्या घरी मिळाली त्यावेळी त्याला धक्का बसला. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहून सर्व घडलेला प्रकार सांगितला. अॅमेझॉनने फसवणूक केली आहे. 21 जुलै रोजी अॅमेझॉन इंडियाकडून Tissot PRX हे घड्याळ ऑर्डर केले होते. त्याची डिलिव्हरी 28 जुलैला होती. त्यानंतर त्याने अॅमेझॉनच्या अधिकृत संकेतस्थळावर शहानिशा केली. त्यावेळी घटना उघड झाल्याचे त्याने त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.
अॅमेझॉनच्या अधिकृत संकेतस्थळावर ज्यावेळी त्याने घड्याळाबाबत तपासले असता त्या घड्याळाला कोणीतरी 15 फेब्रुवारी 2023 रोजी खरेदी केले होते. जे एक वर्ष जुने होते. युजरने ही पोस्ट 13 ऑगस्ट रोजी शेअर केली होती आणि आतापर्यंत 4.9 मिलियन युजर्सनी ही पोस्ट पाहिली आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. युजरने हे घड्याळ ज्यावेळी रिप्लेस केले त्यावेळी त्याला अरमानी घड्याळ पाठवण्यात आले. त्यानंतर त्याने ही पोस्ट लिहिली आहे.