मणिपूरमध्ये पाच जिह्यांमध्ये इंटरनेट बंदी वाढवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाइल फोटो

मणिपूरमध्ये उफाळून आलेल्या हिंसारनंतर अजूनही तणावपूर्ण वातावरण कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने पाच जिह्यांमधील इंटरनेट सेवा आणखी दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या आठवड्यात बिष्णुपूर जिह्यात एका घरात फेकलेल्या बॉम्बच्या स्फोटात सहा महिन्यांची चिमुकली आणि तिच्या पाच वर्षांच्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त जमावाने जवळच्या सीआरपीएफ छावणीवर हल्ला केला होता. त्यावेळी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे राज्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. यामुळे इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपूर या जिह्यांमध्ये इंटरनेट तसेच व्हीपीएन सेवा आणखी दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. राज्याच्या गृह विभागाने याबाबत रविवारी आदेश जारी केले.