
मणिपूरमध्ये एका कुकी नॅशनल आर्मीच्या दहशतवाद्यासह तीन जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचा देखील समावेश आहे. या हत्यांची जबाबादारी युनायटेड कुकी नॅशनल आर्मी या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
चुरचंदपूर जिल्ह्यातील के. मोंगजांग गावात सोमवारी दुपारी एकच्या सुमारास युनायटेड कुकी नॅशनल आर्मी च्या दहशतवाद्यांनी कुकी नॅशनल आर्मीचा दहशतवादी थेनखोथांग हाओकिप उर्फ थापी याच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात थापीसह, सेखोगिन, लेंगोहाओ आणि 72 वर्षीय महिला फाल्हिंग हे मृत्युमुखी पडले.
थापी याने काही दिवसांपूर्वी युनायटेड कुकी नॅशनल आर्मीचा पब्लिक रिलेशन ऑफिसर तामिन हंटर यांच्यासह 30 जणांची हत्या केली. त्यामुळे हा हल्ला हा थापीला त्या घटनेची शिक्षा देण्यासाठी केल्याचे युनायटेड कुकी नॅशनल आर्मीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.