Manipur Violence : PM मोदी तिथे जाऊन माफी का नाही मागत? बिरेन सिंह यांच्या दिलगिरीनंतर काँग्रेसचा निशाणा

मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचं पहायला मिळत आहे. याबाबत आता स्वतः मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मंगळवारी माफी मागितली. बिरेन सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आणि म्हटले की, ते देश आणि जगभरात फिरतात, पण ते मणिपूरला जाऊन तेथील लोकांची माफी का मागत नाहीत?

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, मणिपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी का दुर्लक्षित करत आहेत, हे अद्यापही तेथील लोकांना समजलं नाही.

यासोबतच त्यांनी पंतप्रधान जाणीवपूर्ण मणिपूरला जाण्याचं टाळत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान मणिपूरला जाऊन तिथे तेच का बोलू (माफी का मागू शकत नाही) शकत नाहीत? ते देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यात फिरतात, मात्र त्यांनी 4 मे 2023 पासून राज्याला भेट देणे जाणीवपूर्ण टाळले आहे.”

‘मला माफ करा’, मणिपूर हिंसाचारावर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मागितली माफी