Photo – लाल साडीमध्ये ‘कला’चा ग्लॅमरस लूक; फोटो पाहून चाहते घायाळ

मराठमोळी अभिनेत्री ईशा केसकर तिच्या उत्तम अभिनयामुळे प्रकाश झोतात असते. ईशाने अनेक मराठी सिनेमे आणि मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ‘जय मल्हार’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमधून तिने प्रसिद्धी मिळवली. सध्या ईशा स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेत कला चांदेकर नावाच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान गणेशोत्सवानिमित्त ‘खजिना बाप्पाच्या गोष्टींचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी कला म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकरने एका नवा लुक केला आहे. या लूकचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

स्टार प्रवाहवरील कार्यक्रमासाठी ईशाने खास लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

यासोबतच तिने केम्प पद्धतीचे दागिने घातले आहेत. मिनिमल नेकलेस, स्टेटमेंट इअररिंग्जसह कानात बुगडी घालून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

  या लूक साठी तिने केस मोकळे सोडले असून सिंपल मेकअप केला आहे. त्यामुळे ईशा कमालीची सुंदर दिसत आहे.

ईशाने फोटो शेअर करताना OBJECT OF DESIRE असे कॅप्शन दिले आहे.

 ईशाने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.