
सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या दीनमित्र साप्ताहिकाच्या संपादकीय कार्याचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज असणारे हे पुस्तक. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा लेखाजोखा असणारे हे पुस्तक सामाजिक सुधारणा चळवळीचा इतिहास जाणून घेणाऱ्यांसाठी संग्राह्य असे आहे.
दीनमित्र – पत्रव्यवहार खंड 1
संपादक : रामदास भोंग, यशवंत साळुंके
प्रकाशक : लोकवाङ्मय गृह
पृष्ठे : 240, ह मूल्य : 400 रुपये
साठ-सत्तरच्या दशकात अमेरिकेत गेलेल्या भारतीयांच्या विशेषत गुजराती लोकांच्या पहिल्या पिढीपासून ते अमेरिकेत जन्मलेल्या पुढच्या पिढीतील समाजाच्या अस्वस्थतेचे दर्शन घडवणार्या या कथा. वेगळ्या संस्कृतीत सामावून जाताना दडपलेल्या भावनांना उघडपणे मांडतात.
गोष्ट नलिनभाईंची …आणि इतरांची
लेखक : पन्ना नायक
अनुवाद : सुषमा शाळिग्राम
प्रकाशक : चपराक प्रकाशन
पृष्ठे : 178, ह मूल्य : 300 रुपये
समाजातील विविध स्तरात काम करताना आलेल्या अनेकविध अनुभवांना दिलेले हे शब्दरूप. घटना, प्रसंग, संस्कार, विचारधारा या माध्यमातून समोर आलेली प्रत्येक गोष्ट एखादं कथाबीज ठरू शकते हे लेखकाने यातून मांडले आहे.
मी माझा
लेखक : डॉ. प्रशांत पाटील
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन
पृष्ठे : 192, ह मूल्य : 300 रुपये
































































