
शेअर बाजारात या आठवड्याची सुरुवात मंदीनेच झाली आहे. वाढत्या जागतिक अस्थिरतेमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी समोवारी बाजारात मोठी घसरण दिसून आली. बाजारात मंगळवारीही घसरणीचे सत्र सुरूच राहिले असून शेअर बाजाराची धूळधाण झाली आहे. या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदारांची दाणादाण उडाली आहे. याघसरणीत गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराची निर्देशांक सेन्सेक्स व्यवहार बंद होताना 1185 अंकांवर होता. तर निफ्टी 400 अंकांनी घसरला होता. शेअर बाजार एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने गुंतवणूकदारांचे १०.१२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
निफ्टीची मंगळवारीच्या एक्सायरी म्हणजेच साप्ताहिक समाप्तीमुळे बाजारातील अस्थिरता वाढली. अनवाइंडिंग/रोलओव्हरमुळे एक्सपायरी दिवसांमध्ये इंट्रा-डे अस्थिरता जास्त असते. मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण सुरू होती. सतत विक्री, तिमाही निकालांचे मिश्र संकेत आणि जागतिक व्यापार तणावाच्या चिंतेमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही दबावाखाली होते. तसेच ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीमुळे जगभरात चिंतेच वातावरण आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांच्या शेअर बाजारात घसरण होत आहे.
दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ४७९ अंकांनी (०.५८%) घसरून ८२,७६६.४१ वर व्यवहार करत होता. तर व्यवहार बंद होताना 3.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1065.71 (1.28%) घसरण होत तो 82,180.47 वर आला होता. तसेच 1.30 वाजाता निफ्टी १७१.७५ अंकांनी (०.६७%) घसरून २५,४१३.७५ वर व्यवहार करत होता. तर बाजार बंद होताना -353.00 (-1.38%) घसरण होत तो 25,191 . 80 वर आला होता.
बजाज फायनान्स, ईटरनल आणि बजाज फिनसर्व्ह या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली. बाजारात मंगळवारी सुमारे ९८३ शेअर्स वधारले, २,३७३ शेअर्स घसरले आणि १४६ शेअर्स स्थिर राहिले.




























































