
कर्नाटकमध्ये बंगळुरू येथील पेंपागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सामूहिक नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने आरएसएसच्या संचलनाला आक्षेप घेतला होता. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आले होते. त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पेंपागौडा विमातळावर नमाज पठण सुरू असताना तेथील सुरक्षा रक्षक मूकपणे बघत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यावरून भाजपने सिद्धरामय्या सरकारवर टीका केली आहे.
विमानतळावर नमाजाला परवानगी कशी दिली जाते? मुख्यमंत्री सिद्धरामय्या व मंत्री प्रियांक खर्गे यांना हे मान्य आहे का? अतिसुरक्षित ठिकाणांमध्ये मोडणाऱया विमानतळासारख्या जागेवर नमाज पठणासाठी पूर्वपरवानगी घेतली होती का, अशी विचारणा भाजपने केली आहे.


























































