
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारात शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युतीचा झंझावात दिसून येत आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शाखा भेटींना उदंड प्रतिसाद मिळत असून शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनादेखील मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा भगवा फडकणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी युतीचे उमेदवार राजू मुल्ला यांच्या कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्ते-मतदारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, शुभदा शिंदे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी घाटकोपर पूर्व पंतनगर येथील शिवसेना शाखा क्र. 131 येथे भेट दिली. यावेळी शिवसैनिक, मनसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रभाग क्र. 199 च्या शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांच्या प्रचार रॅलीचे यशश्री, मंगलमूर्ती सोसायटीतील रहिवाशांनी स्वागत केले.
शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी युतीच्या प्रभाग क्र. 114 मधील उमेदवार राजोल संजय पाटील यांच्या प्रचार फेरीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विभागप्रमुख रमेश कोरगावकर, सिद्धी जाधव, अरविंद नागनुरी, प्रकाश शिंदे, मामी मंचेकर, अस्मिता शिंदे, शाखाप्रमुख राजेश कदम, मधुकरराव कदम, संदीप यादव आदी उपस्थित होते.
चांदिवली विधानसभा मतदारसंघ प्रभाग क्र. 159 मधील शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीप्रकाश शुक्ला यांच्या पदयात्रांना विभागात ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. रेडकर निवास, भीमाशंकर सोसायटी, संत गुलाबाबा सोसायटी, कैलास कुंज परिसर तसेच अन्य भागांत शुक्ला यांचे स्वागत होत आहे. गल्लीबोळांतून फिरत शुक्ला यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.
शीव–प्रतीक्षानगर प्रभाग क्र. 173 मधील शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी युतीच्या उमेदवार प्रणिता वाघधरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून विभागातील टॅक्सी-रिक्षाचालक संघटनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे चिटणीस विशाल आमकर, उपविभागप्रमुख प्रभाकर भोगले, मनसेचे शाखा अध्यक्ष लवू नर, अविनाश किरवे, राजू आंबेरकर, टॅक्सी-रिक्षाचालक पदाधिकारी दिलीप घुगे, प्रकाश शेवाळे, सचिन निकम, मिलिंद मयेकर आदी उपस्थित होते.
प्रभाग क्र. 58 चे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीचे उमेदवार रोहन शिंदे यांच्या प्रचारासाठी भगतसिंग नगर नं. 1, एसआरए कॉलनी, इंदिरा नगर, शरद मित्र मंडळ या ठिकाणी झालेल्या चौकसभेत शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर, विधानसभा संघटक-माजी नगरसेवक दिलीप शिंदे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी शाखा संघटक विमल पाटील, प्रकाश साटम, दशरथ चव्हाण, मनसेचे सचिन सोनावणे, सुरेंद्र गावडे यांच्यासह स्थानिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.




































































