आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

520

आज रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण ते दिवा या जलद अप मार्गावर सकाळी 11.25 ते दुपारी 3.55 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जलद मार्गावरील सर्व फेर्‍या धीम्या मार्गावर धावतील.

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. नेरुळ/बेलापूर ते खारकोपर मार्गावरही हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान पनवेल ते अंधेरी ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या