‘आयबीपीएस’मार्फत लिपिक पदांसाठी मेगाभरती

इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, अर्थात ‘आयबीपीएस’मार्फत मेगाभरती आयोजित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत लिपिक पदांच्या तब्बल 10 हजार 277 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी 1 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पात्र उमेदवार 21 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज भरू शकतात. उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय किमान 20 ते 28 वर्षे असायला हवे. या पदांची सविस्तर माहिती https://ibpsreg.ibps.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.