मी अर्थमंत्री प्रणब मुखर्जींकडे मदत मागतिली होती, विजय माल्ल्याचा खुलासा

बँकांना लुटून देशातून पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या खर्चाचा तपशील उघड झाला आहे

संकटाच्या काळात मी तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांच्याकडे मागितली होती असा खुलासा हिंदुस्थानी विजय मल्ल्याने केला आहे. तसेच बँका सांभाळून घेतील असेही मुखर्जी म्हणाले होते असेही माल्याने म्हटले आहे. बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला मद्यसम्राट विजय माल्याने नुकतंच एका पॉडकास्टमध्ये हे खुलासे केले आहेत.

माल्या म्हणाला की 2008 साली आर्थिक संकटाचा आम्हालाही फटका बसलाय पैसे यायचे थांबले. भारतीय रुपयालाही झटका बसला होता. त्यानंतर आम्ही तत्कालीन अर्थमंत्री विजय माल्या प्रणब मुखर्जी यांना भेटले. माल्याने मुखर्जी यांना सांगितले की किंगफिशरवचा ताण कमी करणे गरजेचे आहे. विमानांची संख्या कमी करून कर्मचारी कपात करण्याची गरज आहे. अशा आर्थिक संकटात काम नाही करू शकत असे माल्याने मुखर्जींना सांगितले. पण मुखर्जी म्हणाले की तुम्ही काम करत रहा बँक तुमची मदत करेल. पण त्यानंतर किंगफिशकर संकटात सापडली. किंगफिशरला सर्व उड्डाणं रद्द करावी लागली, असे माल्या म्हणाला. बँकेनेही नवीन कर्ज द्यायला नकार दिल्याचे माल्याने सांगितले.

तसेच मी चोर नाही असे माल्याने म्हटले, मी पळून गेलो नाही, लंडनला येण्याचे आधीच ठरले होते. तुम्ही मला फरार म्हणू शकता पण मी चोरी कुठे केली असा सवालही माल्याने विचारला.