
यूटय़ूबपाठोपाठ आता मेटानेही मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी फेसबुक अकाऊंट्स ब्लॉक केले. अन-ओरिजिनल, स्पॅम कंटेंट किंवा कंटेंट चोरी करणाऱ्या अकाऊंट्सवर कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय बनावट अकाऊंट्स, रिपिटेटिव्ह पोस्ट आणि ह्यूज किंवा पैशासाठी सिस्टममध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत होते, अशा पाच लाख खात्यांवर दंड ठोठावला आहे.
मेटा आता डुप्लिकेट व्हिडीओ शोधण्यासाठी आणि ते हटवण्यासाठी अॅडव्हान्स डिटेक्शन टूल्सचा वापर करत आहे. याद्वारे ओरिजिनिल पंटेट क्रिएटर्सना त्यांचे श्रेय आणि रिच मिळेल. आता वारंवार पंटेट चोरी करणाऱ्या अकाऊंट्सच्या रिचवर परिणाम होणार नाही, तर अशा अकाऊंट्सना फेसबुक मोनेटायझेशन प्रोग्रॅमद्वारे पैसे कमविण्याची संधीदेखील मिळणार नाही. मेटा सध्या एका वेगळय़ा फीचरची चाचपणी करत आहे.

























































