कोकण, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

गेल्या आठवड्यात अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाचा जोर वाढणार आहे. 16 जुलैपर्यंत महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भात अतिवृष्टी होईल. तसेच पुणे, सातारा आणि घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.