बाप्पाच्या दर्शनासाठी आता मेट्रोने प्रवास करा, मेट्रो 2 ए आणि 7 मार्गावरील गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार 

गणेशोत्सवाचा भाविकांना पुरेपूर आनंद घेता यावा आणि दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मेट्रो गाडय़ा आता मध्यरात्रीपर्यंत धावणार आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत म्हणजेच 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत अंधेरी पश्चिम (2 ए मार्गिका) आणि गुंदवली (7 मार्गिका) या दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून शेवटच्या गाडय़ा आता रात्री 11 ऐवजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

उंचच उंच गणेशमूर्ती आणि नयनरम्य देखावे हे मुंबईतील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील गणेश मंडळांना भेट देणाऱ्या आणि गणपतीचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरळीतपणे व्हावा यासाठी या वाढीव फेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.