
पीयर्स रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कोणाचीही फसवणूक केली नसून म्हाडा तसेच सोसायटीने दिलेल्या एनओसीनुसारच विकास हक्क गहाण ठेवले तसेच संबंधित गहाणखत नोंदणीकृत करण्यात आले असल्याचा दावा केला आहे. म्हाडाची दोनशे कोटींची फसवणूक केली नसल्याचाही दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.
इयर्स रिअल्टी कंपनीने केकेआर इंडिया अॅसेट फायनान्स लिमिटेड या कंपनीद्वारे प्रकल्प कर्ज मिळविले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 28 जून 2018 रोजी केवळ म्हाडा आणि सोसायटीने दिलेला एनओसीनुसार विकास हक्क गहाण ठेवले. त्याचप्रमाणे जमिनीच नव्हे, तर गहाणखतदेखील नोंदणीकृत केल्याचा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
केकेआर कंपनीने महाराष्ट्र नगरमधील प्रकल्पातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा पिअर्स रियालिटीने 49 कोटी कर्जाची संपूर्ण रक्कम स्वतःच्या स्रोतातून परतफेड केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आमच्या कंपनीवर करण्यात आलेले आरोप चुकीचे असून सर्व व्यवहार पारदर्शकपणे केले असल्याचेदेखील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.