
राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या नावावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत साठे यांचे नाव अंतिम करण्यात आले. साठे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अनेक वर्षे वरिष्ठ वकील म्हणून काम केले आहे.































































