BMC Election Results 2026 LIVE : मुंबईत शिवशक्तीने खाते उघडले, वॉर्ड क्रमांक 182 मधून मिलिंद वैद्य विजयी

मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 182 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे उमेदवार मिलिंद वैद्य यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपचे राजन पारकर आणि अपक्ष उमेदवार महेश धनमेहर हे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. तीन उमेदवारांचा पराभव करत मिलिंद वैद्य यांनी विजयश्री खेचून आणली आहे.