
लोकसभा निवडणूकीसाठीच्या मतदानाची टक्केवारी, दुसऱ्या दिवशी जाहीर झालेली टक्केवारी आणि प्रत्यक्ष निकाल यांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करणारा सिटीझनचा अहवाल आज निवडणूक आयोगाने फेटाळला. निवडणूक प्रक्रीयेची बदनामी करण्यासाठी चुकीची मोहीम सुरु करण्यात आल्याचा आरोपही निवडणूक आयोगाने केला. निवडणूक आयोगाच्या या कृतीमुळे हिंदुस्थानात लोकशाहीचा गळा घोटळा जात असल्याची टीका विरोधकांकडून आणि चोहोबाजूंनी होत आहे.
मतदानाची टक्केवारी आणि प्रत्यक्ष निकाल यांमध्ये असलेली मोठी तफावत आणि अचानक वाढलेले मतदान याबद्दल काँग्रेसने शनिवारी व्होट फॉर डेमोव्रेसी या मथळ्याखाली एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने सिटीझन्सचा अहवाल फेटाळून लावला.
काय म्हणाले निवडणूक आयोग?
निवडणूक आयोगाने एक्सवरून सिटीझन्सच्या रिपोर्टबद्दल अनेक ट्वीट्स केले. निवडणूक अतिशय पारदर्शक वातावरणात पार पडल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.
सायंकाळी 7 वाजता किती मतदान झाले याची जवळपास टक्केवारी जाहीर होती. त्यावेळेस अनेक मतदान रांगेत उभे असतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जाहीर झालेली टक्केवारी कमी अधिक असू शकते, असा बचावात्मक पवित्रा निवडणूक आयोगाने एक्सवरून घेतला आहे.