
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी बांधण्यात येत असलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प जवळपास पूर्ण झाला आहे. या प्रकल्पात सहभागी असलेल्या एका अभियंत्याने एक्सवर या प्रकल्पाचा ड्रोनद्वारे शूट केलेला व्हिडीओ शेअर केला. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा अभियांत्रिकीचा एक चमत्कार आहे. उद्घाटनानंतर मुंबई आणि पुणे यांच्यातील अंतर अंदाजे सहा किलोमीटरने कमी होईल. या प्रकल्पाची एकूण लांबी 13.3 किलोमीटर आहे, ज्यामध्ये 650 मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल समाविष्ट आहे. त्याची एकूण उंची 182 मीटर आहे. येत्या मे महिन्यापासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल.
























































