सुप्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा ग्रँड फिनाले रविवारी संपन्न झाला. या धमाकेदार सिझनच्या ट्रॉफीवर रिल्स स्टार सूरज चव्हाण याने आपले नाव कोरले. सूरज पाचव्या सीजनचा विजेता झाला असून अभिजित सावंत उपविजेता ठरला. यानंतर सोशल मीडियावर सूरजसाठी वेगवगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेक राजकारणी आणि कलाकारांनी सुरजचं कौतुक केलं. मात्र काहींना सूरजच्या विजयाला विरोध केला.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर फक्त सूरज ची हवा होती. यावेळी सगळ्यांनी सूरजच कौतुक केलं मात्र अभिनेत्री मिताली मयेकर याबाबत नाराज असल्याची चर्चा आहे. सिझन 5 चा विजेता घोषित झाल्यावर मितालीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. “रिॲलिटी शो की सिंपथी शो” अशी पोस्ट शेअर केली. मिताली मयेकरच्या या पोस्टचं कनेक्शन बिग बॉस मराठी शोसोबत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
अभिनेत्री मिताली मयेकरची ही इंन्स्टा पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, ही इंस्टा स्टोरी व्हायरल होता काही वेळात तिने ती डिलीट केली आहे.
View this post on Instagram