
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या 9 मार्च रोजी 20 वा वर्धापन दिन आहे. यंदाचा वर्धापनदिन सोहळा हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी होणार आहे. वर्धापनदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून स्वतःपासून सदस्य नोंदणीचा शुभारंभ करणार आहेत.
राज ठाकरे यांनी ट्विट करून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे. रायगडाने महाराजांचे वास्तव्य अनुभवलेच पण ‘शिवराज्याभिषेकाचा’ साक्षीदारदेखील हा किल्ला आहे. अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरू करत आहोत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मनसेची सदस्य नोंदणी केवळ महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही तर ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सर्वांना नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचे आहे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले आहे. मार्पेट, शाळा, मंदिरे, पालेजे, मैदाने, बागा अशा सर्व वर्दळीच्या ठिकाणी अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी सदस्य नोंदणीची टेबल्स लावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
काशीनाथाचं चांगभलं…
वाईच्या बावधनचा परिसर आज ‘काशीनाथाचं चांगभलं’च्या गजराने दुमदुमला. बावधनची ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा रविवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. भैरवनाथाचे बगाड सकाळी कृष्णा नदीवर सोनेश्वर येथे पोहोचले. विधिवत स्नान घालून आणि देवदेवतांची पूजा-आरती करून विठ्ठल सोपान कदम याला पारंपरिक पोशाखात बगाडावर टांगण्यात आले. भाविकांनी नारळ व नोटांची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडाला बांधले. बगाडाबरोबर वाघजाई देवी, भैरवनाथ आणि ज्योतिबांच्या पालख्याही वाजतगाजत निघाल्या. सकाळी 10 वाजता निघालेले बगाड सायंकाळी 7 वाजता गावात पोहोचले. शेतातून जाताना बगाडाला 12 बैल तर कच्च्या रस्त्यावर 4 बैल जुंपून बगाड ओढले गेले.






























































