
कुर्ला संकुल – ज्ञानदीप सेवा मंडळाच्या झैद खानने 19 धावांत 6 विकेट घेत मॉडर्न इंग्लिश शाळेचा 114 धावांत खुर्दा पाडत हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा पहिला दिवस गाजवला. ज्ञानदीपने दिवसअखेर 7 बाद 95 अशी मजल मारत आघाडीच्या दिशेने पावले टाकली आहेत. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ओम बांगरने 14 चौकार आणि 1 षटकाराच्या जोरावर 69 धावांची खणखणीत खेळी साकारली. तसेच देवेन यादवच्या 47 धावांमुळे अल बरकतने 202 धावा केल्या. अंजुमन इस्लाम इंग्लिश शाळेने दिवसअखेर 4 बाद 91 अशी मजल मारली.
संक्षिप्त धावफलक
मॉडर्न इंग्लिश शाळा – 39.5 षटकांत सर्व बाद 114 (कणव सैनी 41, झैद खान 6/19, विराट यादव 3/43) वि. ज्ञानदीप सेवा मंडळ – 40 षटकांत 7 बाद 95 (शाश्वत नाईक 2/18, विवान जोबनपुत्रा 2/37, दीक्षांत पाटील 2/17) अल बरकत इंग्लिश शाळा – 58.2 षटकांत सर्व बाद 202 (ओम बांगर 69, देवेन यादव 47, युवान शर्मा 4/50, प्रभात पांडे 3/56) वि. अंजुमन इस्लाम इंग्लिश शाळा – 23 षटकांत 4 बाद 91 (अफझल शेख 34)