
मोखाडा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तोरंगण घाटात एक आयशर ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात सुभाष दिवे (28) याचा जागीच मृत्यू झाला आहे तर 40 हून अधिक प्रवासी मजूर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना उपचारासाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे तर काही जखमींवर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संध्याकळी सहा ते सातच्या आसपास नाशिकहून मोखाडय़ाकडे येणाऱया एका आयशर ट्रकमध्ये तब्बल पन्नासहून अधिक मजूर बसले होते. मोखाडय़ाकडे येत असताना, तोरंगण घाटात या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


























































