अमेरिकेत इस्रायल समर्थकांवर हल्ला

अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यातील बोल्डर शहरात रविवारी एका व्यक्तीने इस्रायल समर्थकांवर हल्ला केल्याने खळबळ उडाली. त्या व्यक्तीने लोकांवर मोलोटोव्ह कॉकटेल फेकल्याने आगीचा भडका उडाला. त्यात अनेक लोक भाजले. पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली आहे. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. रन फॉर देअर लाइव्हज नावाच्या गटाची बैठक सुरू असताना हल्ला झाला. गाझामध्ये हमासने बंदिवान ठेवलेल्या इस्रायलींच्या सुटकेची मागणी बैठकीत केली जात होती. एफबीआयने हल्ल्याची चौकशी सुरू केली आहे. एफबीआयने हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.