
हवामान विभागाने (IMD) देशभरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर, भूस्खलन आणि वादळी वाऱ्यांसाठी काही राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. पंजाबमधील १२ जिल्ह्यांत पूरस्थिती असून, २९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेशात ऑगस्ट महिन्यात ६८ टक्क्यांहून अधिक पाऊस पडला असून, १९४९ नंतरचा सर्वाधिक रेकॉर्ड मोडला गेला. दिल्लीत यमुना नदीचे पाणी वाढले आहे. उत्तराखंडात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे उत्तर हिंदुस्थानात प्रचंड नुकसान झाले आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि दिल्ली येथे पूर आणि भूस्खलनाचा सामना करावा लागत आहे. पंजाबमध्ये १,३१२ गावे प्रभावित झाली असून, २.५६ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. हिमाचलमध्ये १,२७७ रस्ते बंद पडले आहेत.




























































