Monsoon Session 2025 – यशवंत गडाच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी

राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथील यशवंत गड हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असून त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 8 कोटी 18 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून याची सांस्कृतिक विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी दिली. याबाबत भाई जगताप यांनी प्रश्न विचारत यावर सरकारने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी केली होती.