
सीईटी आणि इतर परीक्षा आता परराज्यात न घेता त्या आपल्याच राज्यात घेण्यात येत आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. अभिजित वंजारी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. सीईटीच्या कुठल्याच परीक्षेची केंद्रे खासगी संस्थांना देत नाहीत. पूर्वी बाहेरचे विद्यार्थी या परीक्षांना बसायचे म्हणून पाटणासारख्या ठिकाणी परीक्षा व्हायच्या. पण आता बाहेर परीक्षा घेणे बंद करण्यात आले आहे, असे पाटील म्हणाले.