
कल्याणमधील गोळवली परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस यशवंत भीमराव आंबेडकर आणि प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या नावे तसेच त्यांच्या ताब्यातील बिल्डरने बळकावलेली जमीन वारसांना परत करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. कोणत्याही स्थितीत डॉ.आंबेडकर कुटुंबाची ही जमीन अन्य कोणालाच वापरता येणार नाही. तसे झाल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. आमदार अस्लम शेख यांनी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून या गंभीर प्रकाराकडे सरकारचे लक्ष वेधत दोषींवर कठोर कारवाईची मागणी विधानसभेत केली.