Monsoon Session 2025 – बाल अत्याचाराचे पाच महिन्यांत 10 हजार गुन्हे

महायुती सरकारच्या राजवटीत राज्यात लहान मुले आणि महिलांवरील अत्याचारांच्या गुह्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या पाच महिन्यांत लहान मुलांवरील अत्याचाराच्या 10 हजारांपेक्षा जास्त घटनांची नोंद झाली तर मार्चपर्यंत तीन महिन्यांत महिला अत्याचाराचे 1179 गुन्हे नोंदले गेले. विधानसभेत सादर तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. आमदार काशीनाथ दाते व अन्य सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.