Monsoon Session 2025 – नळगंगा-पैनगंगासाठी निधीची कमतरता नाही

नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. यासाठी आताच्या सर्वेक्षणानुसार 89 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या माध्यमातून 15 तालुक्यांमधील 3 लाख 72 हजार हेक्टरहून अधिक जमीन सिंचनाखाली येईल. तीन टप्प्यांत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.