Monsoon Session 2025 – दूध महासंघातील भविष्य निर्वाह निधी गैरव्यवहार

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघातील भविष्य निर्वाह निधीमधील गैरव्यवहारप्रकरणी तपास सीबीआयकडून सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. याबाबत सदस्य चेतन तुपे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अभिजीत पाटील, सुलभा खोडके यांनी उपप्रश्न उपस्थित केले.