
एसटी महामंडळाच्या पुणे जिह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीत मोठा आर्थिक अपहार झाल्याचे उघड झाले आहे. दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले. या प्रकरणात 22 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा हात असल्याचे विशेष लेखापरीक्षण पथकाने केलेल्या चौकशीत समोर आले. त्यातील 15 कर्मचारी आणि अधिकारी सध्या सेवेत असून सात जण निवृत्त झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.