
नारायण राणे हा एहसान फरामोश, कृतघ्न माणूसच आहे, राणे कुटुंबाची चोच कायम नरकात बुडालेली असते, अशा शब्दांत शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी आज फटकारले. नित्या राणेचा तर त्यांनी नेपाळी वॉचमन असा उल्लेख केला. तमाम मराठी माणूस ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली एकवटल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मराठीद्वेष्ट्या सरकारने राज्याचे वादग्रस्त त्रिभाषा धोरण रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
भास्कर जाधव यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्याचा समाचार घेतला. नारायण राणे यांना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर प्रेम उफाळून आले आहे. आठ दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्या पक्षाचे नेते प्रकाश महाजन यांनी राणे यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. त्यांनी दिलेले उत्तर पुरेसे आहे, असे जाधव म्हणाले. इतरांची काळजी करण्यापेक्षा राणे यांनी स्वतः काढलेला पक्ष एक वर्षातच का सोडला, याचे उत्तर द्यावे. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी का दिली होती, त्याचेही उत्तर महाराष्ट्राला द्यावे, असे ते म्हणाले.
नेपाळी वॉचमन
नेपाळी वॉचमनसारख्या दिसणाऱ्या त्यांच्या मंत्री पोराने माझ्यावर घाणेरड्या भाषेत टीका केली? हेच मंत्री भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्या लोकांची चोच कायम नरकात बुडालेली असते, असे भास्कर जाधव म्हणाले.