
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील घोटाळा उघड केल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेकांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कार्यालयानेही याची गंभीर दखल घेतली आहे. खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेचा घोटाळा उघड केल्यानंतर नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे कार्यालय आता खाडकन जागे झाले असून त्यांनी आता या सर्व प्रकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख किरण काळे यांनी 2016 ते 2020 पर्यंत महानगरपालिकेमध्ये रस्त्यांचा सुमारे एक हजार कोटी रुपयांचा घोटाळ झाला असल्याचा पुरावा त्यांनी प्रशासनाला तसेच राज्यपालांपासून तर सरकारला दिला होता. या प्रकरणाची चौकशी न झाल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी नगर विकास खात्याचा जो भ्रष्ट कारभार सुरू आहे तो कशा पद्धतीने सुरू आहे हे काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांनी सर्वांसमोर आणला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री व या खात्याचे मंत्री यांना काळे यांनी केलेल्या तक्रारी बद्दल आता सरकार या संदर्भात दखल घेणार का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये अनेकांचे धाबे दणाणले.
मोठ्या प्रमाणामध्ये हा घोटाळा असल्यामुळे याची व्याप्ती ही सुद्धा मोठी आहे. शहरप्रमुख किरण काळे यांनी वेळोवेळी गेल्या पाच वर्षापासून पाठपुरावा सुरू केला होता. प्रशासकीय पातळीवर एकमेकांची लागेबांधे असल्यामुळे या प्रकरणाची कुणीच दखल घेतलेली नव्हती. मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार त्यांनी उघड केलेला होता. त्यामुळे त्यांनी याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना दिल्यानंतर आज खासदार राऊत यांनी या घोटाळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन त्यांनी हा विषय केला होता.
आता नगर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या प्रकरणासंदर्भामध्ये त्यांच्या कार्यालयाने गांभीर्याने दखल घेत नेमका हा प्रकार केव्हाचा आहे, केव्हा केव्हा पत्र दिलेली होती. तसेच ही कामे कोणत्या मार्फत, कशी करण्यात आली याची सर्व माहिती घेण्यास त्यांनी तात्काळ सुरुवात केली आहे व तशाप्रकारे सुद्धा यंत्रणा त्यांची कामाला लागलेली आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांची यंत्रणा व पालकमंत्री विखे नेमके आगामी काळात काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.