आयबीपीएसची परीक्षा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे येत्या रविवारी (दि. 25) होणारी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज आयोगाने घेतला. ही परीक्षा पुढे ढकलावी यासाठी स्पर्धा परीक्षार्थींचे गेल्या तीन दिवसांपासून शास्त्री रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या परीक्षेत पृषी सेवेतील जागांचाही समावेश करावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे.
पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेत पृषी विभागाच्या 258 जागांचादेखील समावेश करावा. या 258 जागांसाठी परीक्षा घेण्याचे नोटिफिकेशन काढावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे. पृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे दोन मागण्यांपैकी एक मागणी मान्य झाली असली तरी दुसऱया मागणीसाठी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. आज सलग तिसऱया दिवशीही विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. दुपारनंतर आलेल्या पावसातही हे आंदोलन सुरूच होते.
सर्वसमावेशक परीक्षा शक्य
कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश याच परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थींची मागणी आहे. स्पर्धा परीक्षार्थींनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी रात्रीपासून शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन सुरू केले. महाराष्ट्र पृषी सेवा गट अ, ब आणि ब (कनिष्ठ) संवर्गासाठीची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार असल्यास ही पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबरमध्ये एकत्रित सर्वसमावेशक राज्यसेवा परीक्षा घेणे शक्य आहे आणि तांत्रिकदृष्टय़ा तेच योग्य आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.