मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आज कतारच्या दोहा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प सध्या सौदी अरेबिया, कतार आणि यूएईच्या दौऱ्यावर आहेत. सौदी अरेबियात मोठा संरक्षण करार केल्यानंतर ट्रम्प कतारची राजधानी दोहा येथे पोहोचले. तिथे त्यांनी कतार आणि अमेरिकेदरम्यान अनेक करार केले. याचवेळी मुकेश अंबानी यांनी ट्रम्प यांची भेट घेतली. रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी कतारसोबत कच्च्या तेलाचा व्यापार करते.