
24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 1 लाख 15 हजारांवर गेला असतानाही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱयाला ग्राहकांनी खरेदीचा मुहूर्त साधला. मात्र चढे दर पाहता ग्राहकांनी हलक्या वजनाच्या दागिन्यांना पसंती दिली. मुंबई सराफा बाजारात सुमारे 100 टन सोन्याची उलाढाल झाली.
सोन्याच्या दराने लाखाचा आकडा कधीच पार केला आहे. दसऱयाच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दराने उच्चांक गाठला. दसऱयाच्या दिवशीही दर खाली आले नव्हते. चांदीचा भाव किलोमागे 1 लाख 47 हजार रुपयांपेक्षा अधिक होता.
z जुने सोने बदलून नवीन सोने खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल दिसून आला. चांदीची खरेदी अधिक झाली.
z दुपारनंतर ग्राहकांनी चांगली खरेदी केली. ग्राहकांनी नाणे तसेच हलक्या वजनाचे दागिने म्हणजे मंगळसूत्र, कानातले, अंगठय़ा यांची खरेदी केली. मोठय़ा खरेदीला काहीसा आवर घातला. त्यामुळे सोने खरेदीत अंदाजे 20 टक्के घट दिसून आली, असे ज्वेलर्स आनंद पेडणेकर यांनी सांगितले.



























































