रक्ताने माखलेले कपडे जप्त केले म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही – हायकोर्ट

आरोपीकडून रक्ताने माखलेले कपडे जप्त केले म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही तर पोलीसांच्या या प्रक्रियेतून केवळ संशयच निर्माण होतो असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीचा जामिन अर्ज मंजूर केला. राज शिंदे असे त्या आरोपीचे नाव आहे.

विजयकुमार काजळे हे 14 ऑक्टोबर 2024 साली बेपत्ता झाले दुसर्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला अर्जदार राज शिंदे हा विजयकुमार यांच्या सोबत होता त्यामुळे त्याला गेल्यावर्षी अटक करण्यात आली. जामिनासाठी राज शिंदे याने अॅड तपन थत्ते आणि अॅड विवेक आरोटे यांच्या मार्फत हायकोर्टात अर्ज दाखल केला त्या अर्जावर न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

विजयकुमार यांना शेवटचे राज शिंदे व माऊली नावाच्या व्यक्तीसोबत पाहिले होते तसेच आरोपीकडून रक्ताचे डाग असलेले कपडे जप्त करण्यात आल्याचा दावा सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला तर आरोपी आणि विजयकुमार एकत्र असतानाचा वेळ आणि मृतदेह सापडल्याचा वेळ यामध्ये तफावत असल्याचे आरोपीच्या वकिलांनी सांगितले. न्यायालयाने या युक्तीवादाची दखल घेत आरोपीची 15 हजाराच्या जातमुचलक्यावर सशर्त सुटका केली.