
जगात सर्वात महागडे शहर कोणते? याची यादी ‘मर्सर’च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी 2024 च्या एका अहवालातून जाहीर करण्यात आली. हिंदुस्थानात मुंबई हे सर्वात महागडे शहर ठरले आहे. तर जागतिक पातळीवर मुंबईचा 136 वा नंबर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईच्या क्रमवारीत 11 स्थानांची वाढ झाली आहे. दिल्ली 165 व्या नंबरवर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दिल्लीच्या क्रमवारीत चार स्थानांची वाढ झाली. चेन्नई 195, बंगळुरू 189, हैदराबाद 202, पुणे 205, कोलकाता 207 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानमधील इस्लामाबाद हे शहर जगातील सर्वात स्वस्त शहर आहे.
जगातील टॉप शहरे
टॉप 10 सर्वात महागडय़ा शहरांमध्ये युरोपचा बोलबाला आहे. लंडन 8 व्या, कोपनहेगन 11 व्या, व्हिएन्ना 24 व्या, पॅरिस 29 व्या, अॅमस्टरडॅम 30 व्या क्रमांकावर आहेत. तर दुबई हे शहर 15 व्या क्रमांकावर आहे.