
श्री अंबिका योग कुटिरचे परळ शाखेचे संचालक दत्ताजी मोरे यांचे शनिवारी निधन झाले. मुंबई शहर खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष पद त्यांनी भूषवले होते तसेच ते माझगाव डॉक स्पोर्ट्स क्लब व परळच्या युवक क्रीडा मंडळमध्ये कार्यरत होते. दत्ताजी मोरे यांची शोकसभा उद्या, रविवारी सकाळी 9 वाजता भातणकर मार्ग म्युनिसिपल स्पूल, जगन्नाथ भातणकर मार्ग परळ, शिरोडकर मंडईजवळ, परळ येथे आयोजित करण्यात आली आहे.























































