
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची पंचवार्षिक निवडणूक रविवार, 15 मार्च रोजी होणार आहे. ग्रंथसंग्रहालयाच्या मध्यवर्ती, नायगाव आणि कांदिवली अशा तीन शाखांच्या साधारण सभा सदस्यांसाठी मतदान होईल. मध्यवर्ती शाखेसाठी 3, नायगाव शाखेसाठी 8 आणि कांदिवली शाखेसाठी 1 जागा आहे. दुपारी 12 ते 4 मतदान होणार असून 4.30 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

























































