
जगभरातील महागडय़ा शहरांची यादी प्रसिद्ध झाली आहे. जगात सर्वात महागडे शहर म्हणून हाँगकाँग हे शहर अव्वल आहे. मर्सरच्या या वर्षीच्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर राहण्यासाठी सर्वात महागडय़ा शहरांच्या यादीत नवी दिल्ली 164 व्या, चेन्नई 189 व्या, बंगळुरू 195 व्या, हैदराबाद 202 व्या, कोलकाता 207 व्या व पुणे शहर 205 व्या स्थानी आहे. मुंबई आशियातील 21 वे सर्वात महागडे शहर ठरले आहे. जागतिक यादीत मुंबई 136 व्या स्थानावर आहे. नवी दिल्ली आशियातील महाग शहरांच्या यादीत 30 व्या स्थानी पोहोचलेले शहर ठरले आहे. दिल्ली, मुंबई व पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये राहणीमानाचा खर्च वाढण्यापाठी अनेक कारणे आहेत.