
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी महायुती सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीला कात्री लावली आहे. सामाजिक न्याय विभागाचा 393.25 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे.
हजारो लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नसल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. काही ठिकाणी लाडक्या बहिणींनी आंदोलनेही केली आहेत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जाब विचारल्याच्याही घटना घडल्या. त्यामुळे सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधीतून या योजनेसाठी पैसे वळवले आहेत. जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या मतदानापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा करण्याचा सरकारचा विचार आहे.

























































