नाताळ आणि नववर्षानिमित्त मध्य रेल्वेच्या विशेष ट्रेन; 76 गाड्यांचे वेळापत्रक जाहीर

नाताळ आणि नववर्षानिमित्त बाहेर फिरण्याचे प्लॅनिंग करणाऱ्या पर्यटनप्रेमी प्रवाशांना मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची खुशखबर दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी- करमाळी, एलटीटी तिरुवनंतपुरम या विशेष गाड्यांबरोबरच सीएसएमटी ते नागपूर, पुणे- नागपूर, पुणे- सांगानेर, पुणे-अमरावती या मार्गांवर एकूण 76 हिवाळी हंगाम विशेष ट्रेन प्रवासी सेवेत धावणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी या विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नाताळ आणि नववर्षानिमित्त कुटुंबीयांसोबत फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना या विशेष ट्रेनचा फायदा होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – करमळी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष (एकूण 36 सेवा)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – करमळी गाडी क्र. 01151 ही दैनिक विशेष गाडी 19-12-2025 ते 05-01-2026 या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.20 वाजता सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी 13.30 वाजता पोहोचेल. (18 सेवा)

करमळी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडी क्र. 01152 ही दैनिक विशेष गाडी 19-12-2025 ते 05-01-2026 या कालावधीत दररोज करमळी येथून 14.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पुढील दिवशी 3.45 वाजता पोहोचेल. (18 सेवा)

लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (एकूण 8 सेवा)

लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर गाडी क्र. 01171 ही साप्ताहिक विशेष गाडी 18-12-2025 ते 08-01-2026 या कालावधीत प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 16.00 वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम उत्तर येथे दुसऱ्या दिवशी 23.30 वाजता पोहोचेल. (4 सेवा)

तिरुवनंतपुरम उत्तर– लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी क्र. 01172 ही साप्ताहिक विशेष गाडी 20-12-2025 ते 10-01-2026 या कालावधीत प्रत्येक शनिवारी तिरुवनंतपुरम उत्तर येथून 16.20 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी 1.00 वाजता पोहोचेल. (4 सेवा)

लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरू जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (8 सेवा)

लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरू जंक्शन गाडी क्र. 01185 ही साप्ताहिक विशेष गाडी 16-12-2025 ते 06-01-2026 या कालावधीत प्रत्येक मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 16.00 वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 10.05 वाजता पोहोचेल. (4 सेवा)

मंगळुरू जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी क्र. 01186 ही साप्ताहिक विशेष गाडी 17-12-2025 ते 07-01-2026 या कालावधीत प्रत्येक बुधवारी मंगळुरू जंक्शन येथून 13.00 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 06.50 वाजता पोहोचेल. (4 सेवा)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (6 सेवा)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर गाडी क्र. 01005 ही साप्ताहिक विशेष गाडी 20-12-2025 ते 03-01-2026 या कालावधीत प्रत्येक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.30 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 15.30 वाजता पोहोचेल. (3 सेवा)

नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडी क्र. 01006 ही साप्ताहिक विशेष गाडी 20-12-2025 ते 03-01-2026 या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून 18.10 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 08-25 वाजता पोहोचेल. (3 सेवा)

पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष गाड्या (एकूण 6 सेवा)

पुणे – नागपूर गाडी क्र. 01401 ही साप्ताहिक विशेष गाडी 19-12-2025 ते 02-01-2026 या कालावधीत दर शुक्रवारी पुणे येथून 20.30 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी 14.05 वाजता पोहोचेल. (3 सेवा)

नागपूर–पुणे गाडी क्र. 01402 ही साप्ताहिक विशेष गाडी 20-12-2025 ते 03-01-2026 या कालावधीत दर शनिवारी नागपूर येथून 16.10 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 11.45 वाजता पोहोचेल. (3 सेवा)

पुणे – सांगानेर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (6 सेवा)

पुणे – सांगानेर गाडी क्रमांक 01405 ही साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी 19-12-2025 ते 02-01-2026 या कालावधीत दर शुक्रवारी पुणे स्थानकातून 09-45 वाजता सुटेल आणि सांगानेर येथे दुसऱ्या दिवशी 06.45 वाजता पोहोचेल. (एकूण 3 सेवा)

सांगानेर – पुणे गाडी क्रमांक 01406 ही साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी 20-12-2025 ते 03-01-2026 या कालावधीत दर शनिवारी सांगानेर स्थानकातून 11.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 09.30 वाजता पुणे येथे पोहोचेल. (एकूण 3 सेवा)

पुणे – अमरावती – पुणे साप्ताहिक विशेष गाड्या (6 सेवा)

पुणे-अमरावती गाडी क्रमांक 01403 ही साप्ताहिक विशेष गाडी 20-12-2025 ते 03-01-2026 या कालावधीत दर शनिवारी पुणे स्थानकातून 19-55 वाजता सुटेल आणि पुढील दिवशी 09-25 वाजता अमरावती येथे पोहोचेल. (एकूण 3 सेवा)

अमरावती–पुणे गाडी क्रमांक 01404 ही साप्ताहिक विशेष गाडी 21-12-2025 ते 04-01-2026 या कालावधीत दर रविवारी अमरावती येथून 12.00 वाजता सुटेल आणि पुणे येथे पुढील दिवशी 00.15 वाजता पोहोचेल. (एकूण 3 सेवा)

विशेष गाडी क्रमांक 01403 आणि 01404 यांचे आरक्षण 10-12-2025 पासून सुरू होईल आणि विशेष गाडी क्रमांक 01151, 01171, 01185, 01005, 01006, 01401, 01402 आणि 01405 यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे.

सुपरफास्ट मेल / एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या अनारक्षित जागेसाठी सामान्य शुल्कासह अनारक्षित कोचसाठी तिकिटे यूटीएस द्वारे बुक करता येतात. या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.