
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ विधानभवन परिसरात सर्च मोहीम सुरू केली. विधानभवनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बाहेर गेटवरच रोखण्यात आले आहे. बॉम्बची धमकी कुणी दिली? याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल होत शोधमोहिम सुरू केली. डॉग स्कॉडही घटनास्थळी दाखल झाले आहे.





























































