
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघाताची घटना समोर आली आहे. अकासा एअरलाईनच्या विमानाला कार्गो ट्रकने धडक दिली. विमान कंपनीने निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली आहे. विमानतळ अधिकाऱ्यांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकासा एअरलाइन्सचे एअर बी737 मॅक्स विमान उभे होते. यावेळी एका कार्गो ट्रकने विमानाच्या पंखाला धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर डीजीसीएने दिल्ली आणि मुंबई विमानतळांची पाहणी केली होती. या पाहणीत अनेक वाहनांमध्ये वाहनाच्या वेगावर सतत लक्ष ठेवणारी प्रणाली म्हणजेच स्पीड गवर्नर बसवलेले नसल्याचे आढळून आले होते. अशा वाहनांचे परवाने आणि त्यांच्या चालकांचे विमानतळ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आले.