Mumbai News – विधानभवनाजवळ आत्मदहनाचा प्रयत्न, तरुणावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानभवनात बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरू असतानाच बाहेर एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ धाव घेत तरुणाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दादासो बबन कालसैत असे ताब्यात घेतलेल्या 38 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

माढा तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असलेल्या दादासोने उषा मेहता चौकात आत्मदहनाचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला वेळीच रोखले. दादासोला मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी लोहार समाजाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे बसवण्यात आलेला विश्वकर्माचा पुतळा अलिकडेच काढून टाकल्यामुळे कलसैत अस्वस्थ झाला होता. त्याच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 226 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.