
शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या दादर येथील ‘शिवसेना भवन’च्या अधिकृत दूरध्वनी क्रमांकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शिवसेना नेते, सचिव खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना भवन येथून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
शिवसेना भवनचे नवे दूरध्वनी क्रमांक 022-35243456, 022-35243434, 022-35243440 आणि 022-35243441 असे राहणार आहेत. त्यामुळे शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांनी कार्यालयीन कामकाजासाठी या नवीन दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.


























































