
जागेच्या वादातून दोन भाजी विक्रेत्यांमध्ये मंडईतच तुफान राडा झाला. या मारहाणीत एक जण जखमी झाला आहे. बोरीवलीतील गोराई परिसरात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बोरीवली पश्चिमेतील गोराई भाजी मंडईत सकाळच्या सुमारास विशिष्ट ठिकाणी धंदा लावण्याच्या कारणातून दोन विक्रेत्यांमध्ये वाद झाला. पाहता पाहता वाद विकोपाला गेला अन् हाणामारी सुरू झाली. गर्दीची वेळ असल्याने मंडईत एकच गोंधळ उडाला. यात एका विक्रेत्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.